वाहनांना थांबण्याचीच गरज नाही : नव्या प्रकल्पावर सरकारचे काम सुरू
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्र सरकार अडथळामुक्त टोल कर संकलन प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्मयावर उभे राहावे लागणार नाही. अडथळारहित टोल कर संकलन प्रणालीची चाचणी सध्या सुरू असल्याची माहिती नुकतीच संसदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. सध्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर सुरू असलेली चाचणी यशस्वी होताच त्याची अंमलबजावणी अन्यत्रही केली जाईल. देशातील रस्त्यांवरील अंतराच्या आधारेही टोल भरण्याची प्रणाली लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी प्रणाली लागू झाल्यानंतर त्याची क्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होईल, असे ते म्हणाले.
टोल टॅक्ससाठी सरकार सध्या दोन्ही माध्यमांचा वापर करत आहे. टोल टॅक्सवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याकडून ऑफलाईन वसुली केली जात आहे आणि फास्टॅगच्या मदतीने ऑनलाईन वसुली केली जात आहे. वाहनांमध्ये फास्टॅग वापरल्यामुळे टोल बूथवर लागणारा वेळ 47 सेकंदांपर्यंत कमी झाला आहे, परंतु सरकारला ते 30 सेकंदांपेक्षा कमी करायचा आहे. यासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर पायलट चाचणी सुरू आहे. या प्रणालीमध्ये उपग्रह आणि पॅमेरा आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ज्याप्रमाणे वाहतूक पोलीस चलन काढण्यासाठी सीसीटीव्ही पॅमेऱ्यांची मदत घेतात, त्याचप्रमाणे आता टोलटॅक्स वसुलीसाठी असा पॅमेरा बनवण्यात आला आहे. सदर कॅमेरा चालत्या वाहनाचा टोल टॅक्स वसूल करू शकतो. वाहनात दिसणाऱ्या नंबर प्लेटच्या आधारे हे शक्मय होईल, अशी माहिती देण्यात आली.
महामार्गावरून वाहने धावत असताना टोलभरणा क्षेत्रात सुसज्ज असलेल्या कॅमेऱ्याद्वारे वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन झाल्यानंतर त्याआधारे टोलवसुली होईल. हे तंत्रज्ञान सध्याच्या व्यवस्थेपेक्षा वेगळे आहे. दूरसंचार क्षेत्रासह विविध क्षेत्रात विद्यमान सरकारने केलेल्या कामांमुळेच अशी प्रगती होत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. दूरसंचार नेटवर्कमधील सुधारणांमुळे टोल प्लाझावर वाहनांचा डेटा गोळा करण्यात मदत होणार आहे.









