अर्चना बनगे,प्रतिनिधी
Fast Eating Side Effects : बदलती जीवनशैली आणि फास्ट लाईफ यामुळे आपण अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष करतो. किंवा खूप गडबडीत खातो. ही सवई इतकी जडते की घरीदेखील आपण अन्न न चावताच पटकण गिळून टाकतो. वेळ वाचवण्यासाठी लावलेली ही सवय तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते.घाईत अन्न खाल्ल्याने तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घाईघाईत खाण्याच्या या सवईमुळे तुम्हाला कोणते नुकसान होऊ शकते चला जाणून घेऊया.
अति खाण्याचा बळी होऊ शकता
घाईघाईत अन्न खाताना आपण अनेकदा गरजेपेक्षा जास्तच खातो. ज्याचे आपल्याला त्यावेळी भानही नसते.पटकन खाल्ल्याने पोट भरले आहे की नाही हे लवकर समजत नाही. यामुळे वारंवार खाल्ल्याने तुम्ही अति खाण्याचे बळी होऊ शकता.
वजन वाढू शकते
सतत फास्ट जेवण केल्याने आपण शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जादा खातो. यामुळे आपली पचनक्रिया असंतुलित होते.ज्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होऊ लागते. अशा वेळी घाईघाईत खाल्लेल्या अन्नामुळे अनेक वेळा आपण लठ्ठपणाचेही बळी ठरतो.
पचनक्रियेवर परिणाम होतो
अति घाईत जेवण केल्यामुळे बऱ्याचवेळेला मोठे घास खाल्ले जातात. शिवाय घास न चावता गिळले जातात. कधीकधी अन्न गिळण्यासाठी पाण्याची मदत घेतो. असे अन्न खाल्ल्याने ते नीट पचत नाही, त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात.
मधुमेहाचा धोका वाढतो
घाईघाईत खाल्ल्याने अनेकदा शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.
Previous Articleचीन सीमेवर तैनात होणार ‘प्रलय’ क्षेपणास्त्र
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.