20 स्पर्धकांचा सहभाग : रसिकांसाठी विविध कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अन्नोत्सव 2023’ मध्ये गुरुवारी ‘फॅशन शो’ आणि ‘ग्रुप डान्स स्पर्धा’ पार पडल्या. यावेळी स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण करून रसिकांची दाद मिळविली.
यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अन्नोत्सवाला भेट देऊन गौरवोद्गार काढले. कलाप्रेमींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फॅशन शो व डान्स स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये मुली व महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 6 ते 15 जानेवारीदरम्यान नानावाडी, सावगाव रोड येथील अंगडी
कॉलेज मैदानावर अन्नोत्सव सुरू आहे. येथे रसिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून मेजवानी दिली जात आहे. शिवाय 200 हून अधिक स्टॉलधारक सहभागी आहेत. विविध खाद्य संस्कृती पाहायला मिळत आहे. नागरिकांना दररोज वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा अस्वाद घेता येत आहे. इतर स्टॉलदेखील आकर्षण वाढवत आहेत. व्हेज-नॉनव्हेजचे
स्टॉलदेखील मांडले आहेत. परीक्षक म्हणून अवंती पाटील, अनुजा क्षीरसागर, स्नेहल बिर्जे यांनी काम पाहिले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य, नागरिकांनी गर्दी केली होती.









