वसगडे :
सांगली – पलुस मार्गावरील वसगडे येथील नागाव रेल्वे गेटचे स्थलांतराचे काम असल्याने या मार्गावरील वाहतूक चार दिवसाठी बंद करण्यात येणार आहे. रेल्वे गेट गुरुवारी 13 फेब्रुवारी पासून रविवार 16 फेब्रुवारी पर्यंत बंद होणार असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सध्या ऊस हंगामाचा अंतिम टप्पा असल्याने सांगली,सोनहिरा व क्रांती कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक या मार्गावरून होते.
रस्ता बंद राहिल्यास वाहतूक भिलवडी मार्गे होणार असल्याने ऊस वाहनधारकांना त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने ऊस हंगामानंतर काम करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या मधून होत आहे.
सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून सांगलीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी असल्याने रस्ता सुरू ठेवण्याची मागणी पालकांच्या मधून होत आहे.








