प्रतिनिधी/ चिकोडी: यंदाच्या हंगामात एकहीवळीव झालेला नाही. मान्सुनही लांबला आहे. परिणामी शेतकऱ्यांची उभी पिके वाळुन गेल्याने शेतकऱ्यांना कोट्यावधीच्या पिकांच्या नुकसानीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील वाळलेल्या पिकांपोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. चिकोडी तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा, पिककर्जे माफ करण्यात यावीत, ठिकठिकणी गोशाळा सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन आज (ता.5) राज्य रयत संघ व हरीत सेनेच्या वतीने मंजुनाथ परगौडा यांनी प्रांताधिकारी माधव गीत्ते यांना दिले.
यावेळी बोलताना मंजुनाथ परगौडा म्हणाले, यंदा तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. नद्या, नाले, विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांच्या हजारो एकरातील ऊस पिके वाळुन गेली आहेत. ऊसाची लागण व इतर असा एकरी 30 ते 35 हजाराचा खर्च करावा लागला आहे. रासायनिक खतांचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधी सोडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांची पिक कर्जे माफ करण्यात यावीत. केरुर, येडूर आदि गावातील शेतकऱ्यांची जुनी पिक नुकसान भरपाई अद्याप प्रत्यक्षात त्यांच्या हाती मिळालेली नाही. ती रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी. आणखी 15 दिवस पावसाची स्थिती पाहून तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा. यंदाही पावसाअभावी शेतकरी संकटात सापडले असल्याने शेतकऱ्यांची पिक कर्जे माफ करावीत अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बापू ज्योती मगदूम, अजित मूरनाळे, बसू नडुविनमनी, बाळगौडा पाटील, पोपट साजणे, रफिक पठाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन