विरोध करणाऱ्या शेतक-यांना हातकंणगले पोलिसांनी घेतले ताब्यात
राजू शेट्टीनीं दिला इशारा
कोल्हापूर
रत्नागिरी – नागपूर महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. विरोध केल्यावर जबरदस्तीने भुसंपादनासही विरोध करणाऱ्या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले. शेतक-यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
Previous Articleदूध अनुदानाचे 18 कोटी थकले
Next Article रद्द होण्यापेक्षा कलबुर्गी रेल्वे सांगलीपर्यंत आणा








