विश्वनाथ मोरे , कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या असंख्य समस्या या संपता संपत नाहीत.आता निसर्गाकडून सुद्धा मान्सूनची ओढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला घोर वाढला आहे.मे महिन्याच्या सुरुवातीपासून ऊस व इतर पिकांचे कापणी होऊन मशागतीचे काम युद्ध पातळीवर शेतकरी वर्गात चालू असते. प्रथम नांगरणी करूनशेत 15 ते 20 दिवस तापत ठेवले जाते,नंतर बांडगणी मशागत करून रोटावेटर च्या साह्याने शेताची लेवल केली जाते.व नंतर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत किंवा स्वतःच्या पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाच फणी कुरीच्या सहाय्याने प्रतिवर्षी रोहिणी नक्षत्रावर पेरा केला जातो.मृग नक्षत्रावर मान्सून पावसाची सुरुवात होऊन 15 ते 25 तारखेच्या दरम्यान भाताची उगवण होऊन कोळपणी केली जाते.
यावर्षी जून महिन्याचे वीस तारीख आली तरीसुद्धा मान्सूनचा पत्ता नाही.शेतीची सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे कधी शेतात पेरणी करायची ?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लागणार असे असले तरी सद्यस्थितीला पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.यामध्येच काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने उपसा बंदी आदेश दिला होता.त्यामुळे माळरानातील व शिवारातील ऊस पीक व इतर पिके धोक्यात आली होती.या सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व इरिगेशन डिपार्टमेंट यांनी पाटबंधारे विभागास जाऊन सद्यस्थितीत सांगितले व आजपासून फक्त काही दिवसांसाठीच पाणी उपसा चालू ठेवली आहे.यावेळी 2016 मध्ये यावर्षी सारखेच मान्सून पावसाने उशिरा आगमन झाले होते.तशी घटना सद्यस्थितीला दिसत आहे.शेतकऱ्यांचा पाणी पाळी पत्रकामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी फोर्स लोडिंग ही संकल्पना महावितरण कडून करण्यात आली.त्यामुळे ऊस व इतर पिके आज वाळताना दिसत आहेत.यावर शासन स्तरी योग्य निर्णय घेऊन शेतकरी जगला पाहिजे, यासाठी राहिलेल्या शिल्लक पाणी साठ्यापैकी शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.उद्योगधंदे व इतर बाबीसाठी पाणी न वापरता शेतकऱ्यासाठी पाणी दिले पाहिजे. तरच शेतकरी आपले पीक वाचवू शकेल.पाण्याचा वापर व बचत करणे गरजेचे आहे ,असे माजी पंचायत समिती सभापती,राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

आज शेतकरी राजा आपल्या शेतातील पीक जगले पाहिजे.यासाठी कसाबसा का होईना आपल्या शेतात आलेले ऊस पिक व इतर पिके जगण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहे.लोक राजा राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या दूरदृष्टीपणातून निर्माण झालेल्या मुबलक पाणीसाठा तयार झालेल्या या जिल्ह्यात आज पाण्याची आणी-बाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.जर पाऊस योग्य वेळेस सुरू झाला नाही ,तर जवळपास 400 ते 500 कोटी शेतकरी बळीराजा नुकसानी जाणार असे काही जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.म्हणूनच जोपर्यंत मान्सून पाऊस पावसाची ओढ…शेतकऱ्याच्या जीवास घोर… हा लागूनच राहणार असे सद्य चित्र पहावयास मिळत आहे.









