अन्यायकारक वीज बिल आकारणी विरोधात शेतकऱ्यातून संतापाची लाट
सांगरुळ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील खाटांगळे फिटर अंतर्गत असलेल्या कृषी पंपांची वीज बिले हॉर्सपॉवर प्रमाणे आकारणी केली आहे . गेली चार वर्षे हा प्रकार सुरू असून चुकीच्या आकारणीमुळे थकीत रकमा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी ही वीज बिल आकारणी तात्काळ करावीत व शेती पंपाची वीज बिले पूर्वीप्रमाणे मीटर रीडिंग प्रमाणे करावी यासाठी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मंगळवार १७ रोजी सांगरुळ परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन महावितरण अधिकारी यांना दिले आहे.
खाटांगळे, सांगरुळ, बारावाड्या ,भामटे परिसरात सुमारे सातशे शेती पंप आहेत. गेली कित्येक वर्षे या कृषीपंप धारकांना मीटर रिडींग प्रमाणे बिले दिली जात होती. गेल्या चार वर्षापासून महावितरण ने फिडरवर मीटर रिडींग घेऊन त्याची विभागणी फिडरअंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी पंपांना हॉर्सपावर प्रमाणे करण्याचा अजब प्रयोग सुरू केला आहे . याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून आवाज बिले वसूल केली जात आहेत .यामुळे शेतकऱ्यांच्या मधून संतापाची लाट उसळली आहे .
मीटर प्रमाणे रीडिंग घेतल्यास तीन हॉर्स पॉवरला हजार रुपये बिल येत होते. महावितरणच्या नव्या प्रयोगामुळे ही बिले दुप्पट आली आहेत. आता हॉर्स पॉवर प्रमाणे तीन हजार पासून सुमारे ८० हजार पर्यंत बिले वाढली आहेत. यामुळे पोकळ थकबाकी वाढल्या आहेत. आता ऑक्टोबर कडक उन्हाळा आहे. पिकं काढणीला आली आहेत. पाण्याची गरज असून अशा वेळेला बिल भरल्यानंतरच कनेक्शन देऊ असा तगादा महावितरण कंपनीने लावला जात आहे. अगोदरच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे .त्यातच चालू वर्षाच्या अनियमित व अपुऱ्या पावसामुळे पिकांचे रक्षण करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे .
तरी ही हॉर्सपॉवरप्रमाणे केलेली अन्यायकारक आकारणी रद्द होऊन ती बिले शेती पंपाच्या मीटर रीडिंग प्रमाणे आकारणी करून मिळावीत. वेळोवेळी आपल्या कार्यालयास मोर्चे काढून निवेदन देऊन सुद्धा या कार्यालाकडून काहीही दाखल घेतलेली नाही.ताराबाई पार्क महावितरण कंपनीवर मंगळवार १७ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती देण्यात आली आहे. या मोर्चाला करवीर पश्चिम परिसरातील सर्व शेतकरी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी उत्तम तुकाराम कासोटे , सुनील रघुनाथ कापडे, सरदार रंगराव ससने ,तानाजी पुंडलिक खाडे, दत्तालय गजानन मोरबाळे, ज्ञानदेव बापू नाळे, तानाजी कुंडलिक खाडे, सरदार रंगराव सासणे, बदाम भिवाजी खाडे, उपस्थित होते.









