औषध वितरणात अधिकाऱ्यांनी गोंधळ केल्याचा आरोप : निलंबन करण्याची मागणी
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यात 14 व 15 तारखेला फलोत्पादन अधिकारी एन. पी. के. रासायनीक खते, औषधे व ट्रे बॉक्स वाटपात सावळा गोंधळ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून संबंधीत अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे कामे करीत आहेत. खतांबाबत विचारले असता 75 टक्के खते रिकामी असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या अधिकाऱ्याने बेकायदेशीरीत्या काम केले आहे. अशांना निलंबित करण्याची मागणी कर्नाटक राज्य शेतकरी महासंघाच्यावतीने करण्यात आली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. सौंदत्ती तालुक्यात शेतकऱ्यांना पोषक असा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीकामात गुंतले आहेत. तसेच पेरणीसाठी बि-बियाणे, खते, औषधे याची जुळवाजुळव करण्यात व्यस्थ झाले आहेत.
शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत खते, बियाणे, अवजारे आदींचे विविध खात्यांतर्गत वितरण करण्यात येते. मात्र फलोत्पादन खात्याकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून वितरणामध्ये गोंधळ करत आहेत. यांच्यावर वेळीच आळा घालून शेतकऱ्यांना खते, औषधांची योग्यरित्या वितरण करावे.फलोत्पादन खात्याकडून सौंदत्ती तालुक्यात 14 आणि 15 जून रोजी पाण्यातील एनपीके, रासायनिक खते, औषधे व ट्रे बॉक्स वितरण करण्यात येणार होते. यासाठी शेतकरी संबंधीत खात्याच्या कार्यालयात सदर साहित्य घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांनी साहित्य 75 टक्के संपले असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बेळगाव गाठून खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत काळा बाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.









