अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रभू राम चंद्राचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांनी खुशाल घ्यावे. त्यांची व्यक्तिगत बाब आहे. परंतु राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. राज्यातील शेतकऱ्य़ांना वाऱ्यावर सोडू नका अशी विनंती शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
पहा VIDEO >>>> एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ झाला
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे. एका व्हिडियोद्वारे संवाद साधताना ते म्हणाले “कांदा, भोपळा, द्राक्ष, पेरू, भाजीपाला यांचं मोठ नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणं शेतकरी आपली पीके जपतो. पण निसर्गाच्या एका फडक्यात होत्याचं नव्हत होतं. शिंदेंच्या राज्यात रामाच राज्य करायचं असेल तर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या” अशी विनंती राजू शेट्टी यांनी केली.








