सातारा :
सातारा जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात डॉ. जे. के. बसू सेंद्रीय शेती पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण दुग्धउत्पादन शेती पुरस्कार, उत्कृष्ट कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी पुरस्कार, तसेच पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी शेतीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
कृषी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. जे. के. बसू सेंद्रीय शेती पुरस्काराने कोयनानगर येथील प्रदीप शेलार, बिदाल येथील सुरेश बोराटे, एकसळचे अमोल भोसले, चिंचणेर निंबचे अशोक जाधव, आसवलीचे संदीप चव्हाण, कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार सासकलचे बबन मुळीक, धुमाळवाडीचे महेंद्र धुमाळ, आसनगावचे उत्तम गाडे, होलेवाडीचे बाळकृष्ण बंडगर, भाटमरळीचे शंकर जाधव, कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन पुरस्कार म्हसवेचे सचिन शेलार, मांडवेचे अजित पाटील, वडोली निळेश्वरचे संजय पवार, कै. यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन शेती पुरस्कार पुसेगावचे शिवम जाधव, कण्हेरीच्या दीपाली भागवत, मुंजवडीच्या स्वाती पवार, राजाळेच्या मनिषा पवार, शेणोलीच्या मानसी कणसे, चोरांबेचे गणपत सपकाळ, उत्कृष्ट कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पुरस्कार खटावचे दीपक महागंडे, सातारचे डॉ. सत्यजित शिंदे, तसेच पीक स्पर्धेतील कालगावचे रमेश चव्हाण, खुटबावचे दत्तात्रय राऊत, जोरचे विलास पवार, पाडळीचे शिवाजी चोपडे, सासकल येथील तुकाराम मुळीक, शिंदेगावचे विठ्ठल मुळगावकर, नागठाणेचे गणेश साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी शेतीचे महत्व पटवून दिले. कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी प्रास्ताविक केले तर आभार विस्तार अधिकारी बाळासाहेब केवटे यांनी मानले. सूत्रसंचालन अंकुश सोनावले यांनी केले.








