10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक सहकार कुक्कुटपालन महामंडळातर्फे ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना कोंबड्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. संबंधित लाभार्थी महिलांकडून अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघात कोंबड्यांचे वितरण केले जाणार आहे. इच्छुकांनी आधार कार्ड, बीपीएल कार्ड, जात प्रमाणपत्र आणि छायाचित्रासह 10 जानेवारीपर्यंत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कुक्कुट महामंडळातर्फे गावरान आणि इतर जातीच्या कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातीतील महिला अल्पसंख्याक महिला, सामान्य महिला आणि शेतकरी महिलांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघात या कोंबड्यांचे वाटप होणार आहे. अलीकडे कुक्कुटपालन व्यवसाय वाढू लागला आहे. ग्रामीण भागात पाळीव जनावरांबरोबर कोंबड्या पाळल्या जातात. दरम्यान शेतकरी महिलांना जातीवंत कोंबड्या मिळाव्यात, यासाठी कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे.









