राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या फेजीवडे गावात सायंकाळी 5 वाजता भोगावती नदी काठच्या शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले . गणी उस्मान राऊत (वय -60) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
फेजीवडे गावात सायंकाळच्यावेळी गणी राऊत हे शेतकरी त्यांच्या शेतात काम करत होते. यावेळी नदी काठच्या शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने पायात शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या कंबरेला जोरदार मार बसला. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ,मात्र जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर गव्याचा वावर असून, शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात काम करावे लागत आहे. गव्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाकडून जखमींला तातडीने मदत मिळावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









