दंश केलेल्या सापाला बाटलीत बंद करून दाखल
बेळगाव : सर्पदंश झाल्यानंतर शेतकरी दंश केलेल्या सापासह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावातील यल्लाप्पा नामक शेतकरी मंगळवारी शेतावर गेला होता. त्यावेळी त्यांना सर्पदंश झाला. ज्या सापाने दंश केला तो साप त्यांनी पकडून एका बाटलीत घातला. त्यानंतर सापासह ते उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सापसोबत घेऊन एक जण सिव्हिलमध्ये दाखल झाल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. दंश झालेल्या इसमावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.









