शनिवारपासून तीन दिवस आयोजन : 23 देशांतील 25 हजारांची उपस्थिती,सनातन हिंदु सामर्थ्याचे शक्तीप्रदर्शन
फोंडा : सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या 83 व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर दि. 17 ते 19 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ची तयारी पूर्ण झाली आहे. साधारण 25 हजार प्रतिनिधी या महोत्सवाला उपस्थिती लावणार असून प्रशस्त असे वातानुकुलीत शामियाने, प्रदर्शन मंडप व महोत्सवाला साजेसे मंदिराचे प्रतिकात्मक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. कुंभमेळ्याला असंख्य भाविक, संत-महंत जसे एकत्र येतात, तशाच स्वऊपाची व्यवस्था उभारण्यात आली आहे.
या महोत्सवात 23 देशांतील नागरिक आणि संत महंत, धर्मप्रेमी हिंदू, तसेच 25 हजारांहून अधिक भाविक 4 ते 5 दिवस वास्तव्य करणार आहेत. महोत्सवाअंतर्गत एक कोटी रामनाम जपयज्ञ, शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन, विविध संतांच्या पावन पादुका, एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मीळ दर्शन आणि महाधन्वंतरी ते शतचंडी यज्ञयाग अशा उपक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी महोत्सवाच्या कार्यस्थळावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्योजक जयंत मिरिंगकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक व सुचेंद्र अग्नी हे उपस्थित होते.
महोत्सवाची ठळक वैशिष्ट्यो
महोत्सवाच्या खुल्या जागेत 38 फूट उंचीचा भव्य धर्मध्वज उभारण्यात येणार आहे. 1 लाख 26 हजार चौरस मीटर जागेत शामियाने व अन्य व्यवस्था उभारण्यात आली असून त्यात 25 हजार लोकांना बसण्यासाठी वातानुकुलित मंडपव्यवस्था आहे. एकावेळी 8 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था, हजारो वाहनांसाठी 17 पार्किंग झोन अशी एकंदरीत व्यवस्था आहे. याशिवाय भव्य धार्मिक ग्रंथ विक्री केंद्र, गो-कक्ष, श्री अन्नपूर्णा कक्ष, गुऊमंदिर, 6 हजार चौरस फुटाचे शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन, 15 संतांच्या पावन पादुका कक्ष, एक हजार वर्षांपूर्वीचे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन कक्ष ही या महोत्सवाची काही ठळक वैशिष्ट्यो आहेत. महोत्सवात सुरक्षेसाठी पोलिस मनोरे, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, अनेक ऊग्णवाहिका, बाईक अॅम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय केंद्रात 16 डॉक्टर्स, सुव्यवस्थापनासाठी प्रशासनाच्या 25 विभागांसाठी जागा, माध्यम प्रतिनिधींसाठी कक्ष, तसेच अन्य आवश्यक त्या सुविधा असणार आहेत. या महोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांना प्रवेशासाठी शासनमान्य ओळखपत्र अनिवार्य असल्याचे वर्तक यांनी सांगितले.









