पुढील हंगामावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळसह राज्यातील द्राक्ष बागांना अवकाळीचा जबर फटका बसला आहे. या नुकसानीबाबत आमदार रोहित पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. अवकाळी, ढगाळ वातावरण आणि हवामानातील अनपेक्षित बदलामुळे द्राक्ष शेती अडचणीत आली आहे. पुढील हंगामावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चिनी बेदाण्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चुकीचे उत्तर देत असल्याचे सांगत त्यांना चांगलेच धारेवर धरले. रोहित पाटील म्हणाले, द्राक्षांवर रोगराई पसरत आहे. कृषी विभागाकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळत नाही.
द्राक्षाच्या अभ्यासासाठी शासनाने तातडीने कृषि तज्ज्ञांची समिती पावसाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना आमवार रोहित पाटील. नेमण्याची मागणी केली. तसेच विमा कंपन्या वेळेवर भरपाई देत नाहीत. विम्यासाठी आकारली जाणारी एकरी रक्कमही शेतकऱ्यांना परवडत नाही.
द्राक्ष विम्याचा कालावधी १ वर्ष ब्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण गरजेचे द्राक्ष उत्पादकांसाठी नवे धोरण तयार करणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील अनपेक्षित बदलामुळे द्राक्ष शेती तोट्यात आहे. याची मोठी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. द्राक्ष शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे.
वेळेत निर्णय घेतला नाही, तर भविष्यात द्राक्ष दिसेनासे होतील, याबाबत सर्वांनी गांभीयनि विचार करावा, असे आवाहन आमदार रोहित पाटील यांनी केले. करावा, पर्जन्याच्या अटी शिथिल कराव्यात, विम्याच्या अटींमध्ये शेतकरी हिताचे बदल करावेत, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना कृषिमंत्री कोकाटे यांची तारांबळ उडाली.
रोहित पाटील यांनी मिळालेल्या उत्तरावर हरकत घेत सभागृहात नाराजी व्यक्त केली. कृषिमंत्र्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्रावर दिलेली उत्तरे जुजबी व बेजबाबदार असल्याचे म्हणत रोहित पाटील आक्रमक झाले. नंतर विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केली. शेवटी कृषिमंत्र्यांनी या मुद्यावर लवकरच उच्चस्तरीय घेण्याचे आश्वासन दिले.
चिनी बेदाण्यामुळे नुकसान
नेपाळमार्गे येणाऱ्या चिनी बेदाण्यांमुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. याबर कारवाईची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांनी रोहित पाटील यांचा मुद्दा योग्य असल्याचे नमूद करत कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.








