वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये रविवारी पाच दिवसांच्या गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. पूर्व भागातील बसवण कुडची, शिंदोळी, बसरीकट्टी, निलजी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मोदगा, सुळेभावी, कणबर्गी कलखांब, मुचंडी आदी गावामध्ये रविवारी पाच दिवसांच्या गणपतीला निरोप दिला. दुपारनंतर घरगुती गणपतींचे विहिरी व तलावांमध्ये विसर्जन करण्यास प्रारंभ करण्यात आला. यंदा पूर्वभागामध्ये भरपूर पाऊस झाल्याने विहिरी व तलावे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे श्रीमूर्तीं विसर्जनाचा प्रश्न मिटला आहे. घरगुती गणपतीबरोबरच काही सार्वजनिक गणपतींनाही निरोप देण्यात आला.









