प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजच्या द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडे व अजय पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. बी. हुंदरे होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मंगल कुकडोळकर हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी 2014 ते 2022 पर्यंत प्राचार्य, माजी प्राध्यापकवर्ग व हितचिंतकांनी ठेवलेली पारितोषिके पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. आदर्श विद्यार्थी म्हणून प्रसाद कुंभार व आदर्श विद्यार्थिनी म्हणून पूजा चापाळकर यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्यावतीने ऋतिका जाधव, प्रियांका हळब, स्वाती सुतार, विठोबा जंगले, सोनाली हुंदरे, प्रसाद कुंभार, पूजा चापाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांतर्फे अंजली कुलकर्णी, रेणूका अंबी यांनीही अनुभव कथन केले. प्राध्यापकांतर्फे व्ही. पी. महाजन यांनी आपले विचार मांडले. अजय पाटील यांनी डीएडबद्दलचा गैरसमज दूर करून पुढील काळात डीएडला उज्ज्वल भवितव्य असल्याचे सांगितले. किशोर काकडे यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य हुंदरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन रेणूका हावळ व मंगल कुकडोळकर यांनी केले. सोनाली हुंदरे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. के. ए. हगिदळे, प्रा. पी. एम. सुभेदार, प्रा. एस. एन. गोल्याळकर, प्रा. शिवानी कारेकर, सुरेश नाझरे, कल्लाप्पा परसण्णावर तसेच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.








