वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये गुरुवारी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात जड अंत:करणाने गणरायाला निरोप देण्यात आला. पूर्व भागातील बसवण कुडची, शिंदोळी ,निलजी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, करडीगुद्दी आदि गावांमध्ये सकाळपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाला प्रारंभ करण्यात आला. पायी चालत तसेच ट्रॅक्टर, रिक्षा व इतर वाहनांतून घरगुती गणपतीना विसर्जनासाठी घेऊन जाण्यात येत होते. सायंकाळपर्यंत घरगुती गणपतींचे विसर्जन सुरूच होते. दुपारनंतर सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. काही मंडळांनी मिरवणुकीआधीच श्रीफळांचा लिलाव केला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका गावागावात सुरू होत्या. मारीहाळ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.









