प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मिलिटरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. गोवा व कोकणातील विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. लोकमान्य सोसायटीचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच पॅरामिलिटरी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांमध्ये आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन केले. यावेळी व्यवस्थापक रणजीत उचगावकर, विनायक कोकितकर यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने बँकिंग क्षेत्रासोबत शिक्षण, टूर्स, विमा, हॉटेल, रिसॉर्ट या व्यवसायांसह अनेक सामाजिक संस्था उभारल्या आहेत. बेळगाव, खानापूर तालुक्मयातील अनेक खेडी दत्तक घेऊन संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला.
संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हय़ांमधील विद्यार्थ्यांना मिलिटरी प्रशिक्षणाबद्दल सखोल माहिती मिळावी, यासाठी लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमी सुरू करण्यात आली. या अकॅडमीचे अनेक विद्यार्थी सैन्यासह पॅरामिलिटरी फोर्समध्ये वरि÷ पदावर सेवा बजावत आहेत. या ठिकाणी प्रशिक्षणासोबत लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन व शारीरिक व्यायाम करून घेतला जातो.
अधिक माहितीसाठी लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमी (वेद मंदिर) दुसरा स्टेज राणी चन्नम्मानगर यांच्याशी संपर्क साधावा अथवा 0831-2420120, 7022469543 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









