कोल्हापूर : जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील फरांडेबाबा यांची भाकणूक आज पार पडली. यामध्ये फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा दर वर्षी प्रमाणे यंदाही अंदाज वर्तवला आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ही यात्रा गावपातळीवर पुजारी व मानकरी यांच्या उपस्थिती पार पडली.परंतु,यंदा कोरोना मराहमारीचे संकट ओसरल्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेश,गोवा,उत्तर प्रदेश येथून भविकांनी हजेरी लावली.हजारो भाविकांच्या उपस्थितीत यांदा फरांडे बाबांचा हेडाम व भाकणूक सोहळा पार पडला.यावेळी फरांडे बाबांनी पुढील वर्षभरातील अंदाज सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील जागृत देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव या देवाच्या यात्रेसाठी येत असताना नवरात्रीपासूनच खेलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांचा कडक उपवास असतो. श्री विठ्ठल बिरूदेवाच्या दर्शनानंतरच ते उपवासाची सांगता करतात. कडक उपवासाच्या दिवसातही आपल्या गावातून अंजन गावातून पायी चालत ते सलग दहा दिवस येत असतात.देव आणि भक्त यांच्यातील निश्चित भक्तीचे हे प्रतीक मानले जाते. निरंकार आपल्या भाविक सहकाऱ्यांच्या बरोबर पायी चालत येऊन देवाच्या दर्शनानंतर उपवास सोडतात.उपवास धरणे व काही दिवसानंतर सोडणे ही एक खडतर तपश्चर्याच असते.
फरांडे महाराजांची भाकनुक
पर्जन्य—- मेघराजाचे प्रमाण वाढून गैरहंगामी बरसेल.
धारण— दोन सव्वादोन-तीन असेच वाढत जाऊन महागाईचा प्रचंड आगडोंब उसळेल.
राजनीती– राजकारणात गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल.
भुमाता– देशात नदीजोड प्रकल्प उद्यास येईल .पूर्वोत्तर राज्यातही समान नागरी कायद्याकडे वाटचाल होईल .
बळीराजा— बळीराजाच या देशाचा खरा राजा होईल .
सीमावाद— सीमेवरून अनेक देशात आपापसात युद्धजन परस्थिती निर्माण होईल.
महासत्ता— भारत महासत्तेच्या दिशेने जाऊन जागतिक नेतृत्वात वेग घेईल.
हितसंबंध —बहिण भावात मालमत्तेवरून तंटे होतील.
कांबळ— देव मेंढका होऊन ,डोळ्याने पाहून निष्ठावंत सेवक व मेंढीमाऊलींचा रक्षक बनेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









