प्रतिनिधी /पणजी
भारतीय गजल संमेलनात ‘गजल गुंजन’ या कार्यक्रमांत गोमंतकीय संगीतकार आणि गजल गायक अजय नाईक यांनी सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.
कविवर्य तथा गजल सम्राट सुरेश भट गजल नगरी, अकोला, महाराष्ट्र येथे गजल सागर प्रति÷ान, मुंबई आणि तिष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथील दोन दिवसीय दहावे अखिल भारतीय गजल संमेलनाता त्यांना स्वरबद्ध केलेल्या गजलचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमात त्यांनी गोमंतकीय गजल रचनाकार राधा भावे यांची स्त्री हृदयाचं मर्म सागणारी गजल ‘खीणां खीणां उज्यविणे जाळता अस्तुरी’ सादर केली. या गजलेला रसिकांकडून ‘वन्स मोअर’च प्रतिसाद मिळाला. गोमंतकीय गजल रचनाकार राजय पवार यांची ‘देखलें तुका चडली भांग गो’ ही गजल सादर झाली तसेच राजयची दुसरी गजल ‘फुलता कळे जेन्ना काळजात’ अशा एकाहून एक अश्या गजल सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमात हार्मोनियम वादन आणि संगीतसंयोजन सुधाकर अंबुस्कर तर गिरीश पाठक (तबला), पावन सिदाम (तबला), अब्रार अहमद (संतूर), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), संदीप कपूर (गिटार) आणि सुमंत अंबुस्कर(गिटार) या सर्वाची संगीत साथ मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन किशोर बळी व किरण वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितात गजल नवाज पं. भीमराव पांचाळे, संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे व इतर गजल जाणकार हजर होते.









