स्वत:च्या ओठांमुळे प्रसिद्ध महिला बुल्गारियातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
जगात लोक स्वत:च्या कौशल्याद्वारे विक्रम नोंदवत असतात, यामुळे ते लोकप्रिय देखील ठरतात. परंतु एक महिला स्वत:च्या कौशल्यामुळे प्रसिद्ध झालेली नाही. तर स्वत:च्या ओठांमुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. बुल्गारियातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर स्वत:चे ओठ जगातील सर्वात मोठे ओठ असल्याचा दावा करते. ही महिला आता स्वत:साठी प्रियकराचा शोध घेत आहे.
एंड्रिया इवानवो 25 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. स्वत:च्या या ओळखीपेक्षा ती स्वत:च्या ओठांमुळे प्रसिद्ध झाली आहे. तिने लाखो रुपये खर्च करून स्वत:च्या ओठांचा आकार मोठा करून घेतला आहे.

तिच्या या लुकमुळे तिला कुठलाच युवक पसंत करत नसल्याची स्थिती आहे आणि हीच तिची सर्वात मोठी समस्या आहे. आता मी एका चांगल्या प्रियकराच्या शोधात आहे. माझ्या अशा स्वरुपासोबत स्वीकारणारा युवक असावा हीच माझी एकमेव अट असल्याचे ती सांगते. एखाद्याला माझे हे रुप आवडत नसल्यास मी त्याच्यासोबत राहू शकणार नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
एंड्रिया हिला शिक्षण घेत असतानाच स्वत:च्या ओठांचा आकार मोठा करून घेण्याचा ध्यास लागला होता. तिने ओठांमध्ये इतके फिलर बसविले आहेत, की डॉक्टरांनी काही काळानंतर अधिक फिलर इंजेक्ट करण्यास नकार दिला आहे. तिच्यासाठी हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. अधिक फिलर इंजेक्ट केल्यास तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात असे डॉक्टरांनी म्हटले आहे.









