वयाच्या 63 व्या वषी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध पॅशन डिझायनर रोहित बल यांचे शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी निधन झाले. पॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने (एफडीसीआय) या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे. रोहित बल हे ‘एफडीसीआय’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी भारतीय पॅशनला नवीन उंचीवर नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
प्रसिद्ध पॅशन डिझायनर रोहित बल गेल्या काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. याचदरम्यान त्यांनी वयाच्या 63 व्या वषी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने केवळ पॅशन जगतच नाही तर संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.









