अर्चना बनगे, प्रतिनिधी
India Tourism Food : पर्यटन म्हटलं की प्रवासा सोबत खाद्य-पदार्थ हे आलेचं. जे खाण्याच्या बाबतीत शोकिन असतात ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणावरील खाद्यपदार्थांवर ताव मारतातच. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना वेगवेगळ्या पदार्थांची आणि पदार्थांची नावे ऐकून तोंडाला पाणी सुटते, तर संधी मिळताच तुम्ही या पाच शहरांची ही प्रसिद्ध डिश नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला प्रवासासोबत आनंद अनुभवायला मिळेल.

तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर दिल्लीतील चांदणी चौकाला नक्की भेट द्या. हा परिसर खाण्यापिण्याचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. पराठा वाली गली, छोले भटुरे आणि छोले कुल्चे या पराठ्यांशिवाय इथले पदार्थही खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा.

तुम्ही कधी मुंबईला गेलात तर तिथल्या प्रसिद्ध डिश वडा पावाचा आस्वाद नक्कीच घ्या.

जेव्हा तुम्हाला गुलाबी शहर जयपूरला भेट देण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही तिथल्या ‘दाल बाटी चुरमा’चा नक्कीच आस्वाद घ्या. जयपूरला गेल्यावरही जर तुम्ही दाल बाटी चुरमा खाल्ला नाही तर तुमचा खाण्याची चव घेण्याचा प्रवास अपूर्णच राहील.

जर तुम्ही हैदराबादला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील उत्तम मुगलाई, तुर्की आणि अरबी खाद्यपदार्थ नक्कीच खा. याशिवाय येथील बिर्याणी सर्वत्र प्रसिद्ध आहे. इथल्या कच्च्या चिकन बिर्याणीशिवाय हैदराबादी बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे.

लखनऊला नवाबांचे शहर म्हटले जाते. तुम्ही जेव्हा कधी इथे जाण्याचा विचार कराल तेव्हा इथला गोलगप्पा नक्की खा. येथे गोलगप्पा खाण्यासाठी पाच प्रकारचे पाणी दिले जाते. याशिवाय अमीनाबादमध्ये कुल्फी खाण्याचा आनंद घ्या.









