कोट्टायम :
केरळच्या कोट्टायममध्ये मंगळवारी उद्योजक आणि त्याच्या पत्नीची घरात हत्या करण्यात आली. थिरुवथुक्कलमध्ये उद्योजक आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्याच घरात आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत उद्योजकाचे नाव विजयकुमार असून तो एका ऑडिटोरियमचा मालक होता, तसेच तो अनेक व्यावसायिक संस्थाही चालवित होता. त्याची पत्नी मीरा देखील घरात मृत आढळून आली आहे.









