वृत्तसंस्था/ कोलकाता
प्रसिद्ध बंगाली गायक आणि गीतकार प्रतुल मुखोपाध्याय यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतुल मुखोपाध्याय हे स्वादुपिंडाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्यातच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ‘आयटीयू’मध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांना वाचवता आले नाही. यापूर्वी त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते.









