Nitin Desai Suicide News : प्रख्यात सुप्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतस्थित एन.डी स्टुडिओत पहाटे 4 वाजता त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या आत्महत्येनं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हादरली आहे.अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मंगल पांडे, स्वदेस, जोधा अकबरसारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी जीवन संपवलं. एनडी स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं समजल्या नंतर त्यांनी त्वरित स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे 9 ऑगस्ट 1965 रोजी झाला. ते प्रसिध्द कलादिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी परिंदा, डॉन, माचिस, वजूद, 1942 अ लव्ह स्टोरी, अकेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलामा बॉम्बे!, हम दिल दे चुके सनम, बादशाह, मिशन कश्मीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोधा अकबर, राजू चाचा, एक दो का चार,देवदास,अन्नरथ, द लेडेंड ऑफ बगत सिंह, एक हिंदुस्तानी असे अनेक सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक केले होते.
नितिश देसाई यांनी 80 च्या दशकामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितिन देसाई यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. देसाई यांनी अथक मेहनतीने त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितिन देसाई यांनी सांभाळली आहे.