पालकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मुलांचे सहकार्य
अलिकडच्या वर्षांमध्ये तरुण-तरुणींमधील नैराश्यावर मोठी चर्चा झाली आहे. हार्वर्डच्या ग्रॅज्युएल स्कूल ऑफ एज्युकेशनमधील संशोधक रिचर्ड वीसबॉर्ड यांनी किशोरवयीनांप्रमाणे आईवडिलही नैराश्याने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात मेकिंग केयरिंग कॉमनने 750 पालकांच्या सर्वेक्षणानंतर एक तृतीयांश किशोरवयीनांचे पालक तणावाचा अनुभव घेत असल्याचा दावा करण्यात आला होता.
वीसबोर्ड यांनी स्टडी केयरिंग फॉर केयरगिव्हर्समध्ये यासंबंधी दावा केला आहे. पालक अन् मुले दोघेही पीडित असल्यास समस्या वाढू शकते. याचमुळे पालकांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे असू याचा प्रभाव पूर्ण घरावर पडत असतो असे त्यांनी म्हटले आहे.

किशोरवयीनांचे म्हणणे ऐकून घ्या
अध्ययनात सामील 40 टक्के किशोरवयीयांनी आईवडिलांनी आमच्या जीवनाविषयी चर्चा करावी, आमची प्रतिक्रिया जाणून घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आईवडिलांनी की-होलद्वारे नव्हे तर दरवाजा उघडून आम्ही काय करत आहोत हे पहावे, असे त्यांचे सांगणे आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याचे तज्ञ विलियम बियर्डस्ली यांनी ‘फॅमिली टॉक’चा पुढाकार सुचविला आहे. यामुळे किशोरवयीनांना भावनात्मक समर्थनासाठी पालकांकडे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते, जे मजबूत नातेसंबंधांचा संकेत आहे.
इतरांचीही मदत घ्यावी
मानसिक आरोग्य विकारांना सामोरे जाताना त्यासंबंधी जाणून घेणे आवश्यक आहे. किशोरवयीन चिंतेत किंवा उदास असल्यास पालकांना शांततापूर्ण, प्रभावी मदत करण्यावर सहकार्याची गरज असते. नैराश्य-चिंतेवर उपचार शक्य असून याकरता इतरांची मदत घ्यावी लागल्यास टाळाटाळ करू नये, असे तज्ञांचे सांगणे आहे. देखभाल करणाऱ्यांवर लक्ष द्या. आईवडिलांनाही मानसिक आरोग्य देखभालीची गरज आहे. आरोग्य केंद्रे, कार्यस्थळे आणि सामुदायिक संस्थांद्वारे आईवडिलांच्या मानसिक आरोग्याला चालना दिल्याने कुटुंबाला लाभ होऊ शकतो, असे बाल मनोचिकित्सक कँटर यांनी म्हटले आहे. नैराश्यग्रस्त पालकांचे किशोरवयीन त्यांच्या वर्तनासाठी स्वत:ला जबाबदार मानतात. याचमुळे मुलांशी बोलताना स्वत:च्या अनुभवांबद्दल प्रामाणिक राहणे पालकांनी शिकून घ्यावे. मुलांचे जीवन अर्थपूर्ण करण्यास पालकांनी मदत करावी.









