खासबागमध्ये फायनान्स कंपनीचा प्रकार
बेळगाव : कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून एका फायनान्स कंपनीने उप्पार गल्ली, खासबाग येथील एका घराला टाळे ठोकले आहेत. त्याआधी घरातील मंडळींना बाहेर काढण्यात आले आहे. अमित खांडेकर यांच्या घराला टाळे ठोकण्यात आले आहे. एका फायनान्स कंपनीकडून घर बांधण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी निम्म्याची परतफेड करण्यात आली आहे. पाच महिन्यांचे हप्ते थकले म्हणून कुटुंबीयांना बाहेर काढून घराला टाळे ठोकण्यात आले आहे.









