Satara Crime : घरगुती कारणातून दाजीने मेव्हुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे घडली आहे. घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले (वय- 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या- उंडाळे, ता. कराड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंडाळे गावच्या पश्चिमेस कराड- रत्नागिरी रोडच्या बाजूस असणाऱ्या माळी वस्ती या ठिकाणी काल रात्री अनंत चतुर्थीच्या दिवशी सचिनमंडलेचा खून करण्यात आला. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रेठरे खुर्द येथील मूळ रहिवाशी असलेले सचिन मंडले हे दूध व्यावसाया निमित्ताने उंडाळे येथे भाड्याच्या घरात राहत होते. काल दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले यात अवधूत मदने यांने धारधार शस्त्राने मेव्हुणा सचिन मंडले यांच्यावर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला . सचिन यास उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. परंतु डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले आहे. कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कराड तालुका पोलिसांनी संशयित आरोपी अवधूत मदने यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मध्यरात्री करवडी येथून त्यास ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास कराड तालुका पोलिस करत आहेत. गणपती विसर्जन सुरू असतानाच घडलेल्या या खुनामुळे उंडाळे परिसरात खळबळ उडाली आहे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









