नवी दिल्ली :
सप्टेंबरच्या शेवटी विदेशी चलन साठ्याने 704.88 अब्ज डॉलर्सची सर्वोच्च पातळी गाठली होती. मात्र 22 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 1.31 अब्ज डॉलर्सने कमी होत 656.58 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. यापूर्वीच्या आठवड्यात म्हणजे 15 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 17.76 अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरावरती कमी होत 657.89 अब्ज डॉलर्सवर कोसळला. विदेशी चलन मालमत्ता 3.04 अब्ज डॉलर्सने घटून 566.79 अब्ज डॉलर्स वर राहिला. सुवर्ण साठा 67.57 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.









