कारवाई कोल्हापूर विभागीय गुणनियंत्रक सुरेंद्र पाटील यांनी केली
सांगली : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या केंद्र शासन अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी गैरवापर करून शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पुणे आणि सांगली येथील दोन उद्योजकांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर विभागीय गुणनियंत्रक सुरेंद्र पाटील यांनी केली.
तसा त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. युरियाच्या बनावट पॅकिंगद्वारे बेकायदेशीर साठा आणि विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी ११३ बॅग युरिया जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात बुटाला न्यूटीव्हेट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक वसंत बुटाला आणि डीडी केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे मालक प्रकाश दुकाने यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत खत नियंत्रण आणि तपासणीचे अधिकार असलेल्या पाटील यांनी पुण्यातील कोथरूड येथील बुटाला न्युट्रीव्हेट प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्याची तपासणी केली. सदर कारखाना वसंतदादा सहकारी कारखान्याच्या जागेत भाडेतत्त्वावर सुरू आहे.
तपासणीदरम्यान, पशुखाद्य निर्मितीमध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या युरियाचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले. भारतीय मानांकन ब्युरो (बीआयएस) नियमानुसार पशुखाद्यात ठराविक प्रमाणात औद्योगिक युरिया वापरण्यात येतो. मात्र, या कारखान्यात शेतीच्या अनुदानित युरियाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले.
शेतीच्या खतांचा बेसुमार वापर
तपासणीत ५० किलोच्या बनावट पॅकिंगमध्ये ११३ बॅग युरिया आढळून आला. या युरियाचे मूळ बिल तपासले असता, सांगलीतील वाटेगाव येथील डीडी केमिकल्स अँड फर्टिलायझर्सकडून ५ मे २०२५ रोजीचे बिल आढळले. या बिलानुसार ५००० किलो युरिया प्रतिकिलो ३५ रुपये दराने, जीएसटीसह एकूण २ लाख ६ हजार, ५०० रुपये किमतीचा साठा खरेदी केल्याचे दिसून आले. हा साठा संशयास्पद असल्याने आणि शेतीसाठीच्या युरियाचा औद्योगिक कारणांसाठी गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने, खत नियंत्रण कायद्यानुसार या ११३ बॅग युरियावर विक्रीबंदी लागू करून जती करण्यात आली.
जप्त केलेला साठा कृषी विभागाकडे
जागेअभावी तात्पुरत्या स्वरूपात बुटाला न्युट्रीव्हेटच्या गोदामात, कंपनीचे सुपरव्हायझर सुनिल पाटील आणि वसीम सय्यद यांच्या संमतीने आणि स्वाक्षरीसह सुरक्षित ठेवण्यात आला आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत हा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीदरम्यान कंपनीकडून मागण्यात आलेले दस्तऐवज अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत.
ऐन हंगामात युरियाची साठेबाजी करून घोटाळा
तपासादरम्यान, डीडी केमिकल्स अँड फर्टिलायझर्सला युरियाच्या खरेवी बिल, बिल ऑफ एन्ट्री, ई-वे बिल, बिल ऑफ लैंडिंग आणि साठवणूक गोवामाच्या तपशीलासह माहिती सावर करण्याची नोटीस वेण्यात आली होती. मात्र, वोन विवसांच्या मुवतीत त्यांनी कोणतेही वस्तऐवज सावर केलेले नाहीत.
युरियाचे तीन नमुने घेण्यात आले असून, त्यापैकी एक नमुना (१४०१२२०१८२०२५२०२६फ) विश्लेषणासाठी कोल्हापूर येथील खत विश्लेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अनेक वुकानवार शेतकऱ्यांना युरिया नाही म्हणून सांगतात पण युरियाचा बोगस साठा सापडल्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
या प्रकरणाचा तपास हवालवार सत्यवान जयपाल सुतार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अनुवानित युरियापासून वंचित ठेवणारा हा घोटाळा उघडकीस आणल्याने शेती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील कायवेशीर कारवाई सुरू असून, वोषींवर कठोर कारवाई होणार का? याची खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.








