प्रतिनिधी/ बेळगाव
बनावट चलनी नोटांचा बेळगावमध्ये सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. शंभर-दोनशेच्या बनावट चलनी नोटा मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे खातरजमा करूनच नोटा स्वीकाराव्यात असे आवाहन केले जात आहे.
यापूर्वी पाचशे, हजार, दोन हजारच्या नोटा बनावट काढल्या जात होत्या. परंतु त्या नोटा चलनात आणणे सहजासहजी सोपे नसल्याने आता शंभर, दोनशेच्या नोटा बाजारात खपविल्या जात आहेत. विशेषतः भाजीविपेते, दूधविपेते, फळविपेते यांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बनावट नोटा दिल्या जात आहेत. गडबडीच्यावेळी नोट बनावट आहे की खरी आहे, हे पाहण्यासह वेळ नसल्याने या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
यामुळे हातावर पोट असणाऱया विपेत्यांना मात्र आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दररोज शेकडो ग्राहक येत असल्यामुळे त्या नोटा कोणी दिल्या? याची माहितीही मिळत नसल्याने नोट टाकून देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. तसेच पोलिसांकडे तक्रार करण्यासही पुरावा नसतो. त्यामुळे या सर्वात त्यांचे नाहक नुकसान होत आहे.









