याप्रकरणी करनूरच्या एकाला अटक
कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांच्या नावाने इंस्टाग्राम वर बनावट अकाऊंट उघडण्यात आले. करनूर मधील तोहीद शेख या मुलाने राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या शितल फराकटे यांच्या नावाने हे बनावट अकाऊंट सुरु केले. या बनावट अकाऊंट वरून त्याने अनेक तरुणींशी चॅटींग केले आहे. यापैकी एका तरुणीने शितल फराकटे यांच्याशी संपर्क साधाला. त्यांना याबद्दल विचारणा केली. याप्रकरणी अधिक चौकशी केल्यावर शितल फराकटे यांना हा प्रकार समजला. हा प्रकार समजतात फरकटे यांनी सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी तोहीद शेख याला मूरगूड पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी तोहीदने तरुणींसोबत अनेक तरुणांशीही संपर्क केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंबंधी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.









