कळे/ वार्ताहर
कोल्हापूर गगनबावडा जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
याबाबतची अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकातील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना, पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार नं. एम.एच.०९ डी. एक्स. ८८८८ मधून बनावट नोटा घेवून काही इसम कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली.
यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांच्या पथकाने कोल्हापूर – गगनबावडा जाणारे रोडवरील मरळी फाटा, ता. पन्हाळा येथे सापळा लावला. त्यानुसार क्रेटा कार आडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील ( वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्वीजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली.
तसेच बनावट नोटा तयार करणारा संदिप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याचे घरामध्ये असे एकूण ४,४५,९००/- रुपये किमंतीच्या ५००/- व १००/- रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८०/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
Previous Articleभद्रकाली ग्रंथालयात कोमसाप मालवणचा कार्यक्रम संपन्न
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.