न्हावेली / वार्ताहर
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव हा लोटांगणासाठी सिंधुदुर्गसह कोकणात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीच्या चरणी जत्रोत्सवानिमित्त अनेक भक्त लीन होतात. त्यामुळे या देवी माऊलीची महती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. जत्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी जत्रोत्सवाच्या योग्य नियोजनासाठी देवस्थान कमिटी, पोलीस प्रशासन, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग आतापासूनच सज्ज झाला आहे.
Previous Articleरिंगरोडच्या स्थगितीसाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे
Next Article म. ए. समितीचा महामेळाव्याचा निर्धार









