पारंपरिक कवळास सोहळा २७ रोजी
सातार्डा –
सातार्डा गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव रविवार दि 26 नोव्हेंबर व पारंपरिक कवळास सोहळा सोमवार दि 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जत्रौत्सवादिवशी रविवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सुहासिनींच्या ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. दुपारी नैवेद्य देण्यात येणार आहे.रात्री 11 वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार दि 27 नोव्हेंबर रोजी श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कवळास सोहळा आहे . सोमवारी सायंकाळी 4 वाजता कवळास सोहळ्याला सुरुवात होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.









