अजब आजारामुळे महिलेचे हाल
जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. यातील काही लोकांना अजब प्रकारच्या शारीरिक स्थितींना सामोरे जावे लागते. काही आजारांवर वैद्यकीय शास्त्रात सहजपणे उपचार उपलब्ध होतात. परंतु काही डिसऑर्डर सामान्य असत नाहीत. असाच एक डिसऑर्डर एका महिलेला असून तिला वाहत्या पाण्याची भीती वाटते.
कधी वॉशरुममध्ये पाणी टबमध्ये भरून वाहून लागण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. हा प्रकार या महिलेला सहन होत नाही. 44 वर्षांपासून ही महिला अजब फोबियाने ग्रस्त आहे. तिने एकाच ठिकाणी अधिक पाणी वाहताना पाहिल्यावर तिला तो धक्का सहन होत नाही आणि ती बेशुद्ध होऊ लागते. या भीतीमागे एक जुनी दुर्घटना कारणीभूत आहे.

युनायटेड किंगडमच्या बकिंगमशायरमध्ये बीकन्सफील्ड येथे ही महिला राहते. या महिलेचे वय 48 वर्षे असून तिचे नाव डार्सी क्राफ्ट आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच वेगाने वाहत्या पाण्याची भीती वाटू लागल्याचे ती सांगते. एकदा तिची आई स्नान करत असताना छत तुटून तिच्यावर कोसळले होते. यावेळी डोर्सीने पाण्याचा मोठा प्रवाह वाहून येत असल्याचे पाहिले हेते. डोर्सी यांच्या आईला काहीच झाले नसले तरीही तिच्या मनात या दुर्घटनेने घर केले होते. यामुळे डोर्सीला वॉटर ओव्हरफ्लो फोबिया झाला असून यामुळे ती बेशुद्ध देखील पडते.
पोहणे पसंत
बालपणी घडलेल्या या घटनेमुळे डार्सीला पॅनिक अटॅक येऊ लागते. डोर्सी यांच्यासोबत आणखी दोन दुर्घटना घडल्या. एकदा त्या बुडण्यापासून वाचल्या होत्या. तर दुसऱया घटनेत बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन कोसळल्या होत्या. या महिलेला पाण्याची भीती वाटत नाही तर वाहते पाणी पाहून चक्कर येऊ लागते. डार्सीने या भीतीवर मात करण्यासाठी हिप्नोटिझमची मदत घेतली आहे. आता 80 टक्क्यांपर्यंत तिचा फोबिया कमी झाला आहे.









