ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर विश्वास ठेवू नका. पुढील २० वर्ष हे सरकार पडणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, हे सरकार काही लवकर जाणार नाही. अनेक जण म्हणत आहेत की हे सरकार पडणार आहे. मध्यवधी लागणार. पडणार असते तर हे सरकार आले असते कशाला? हे सरकार जाण्यासाठी आलेले नाही. हे सरकार पुढील २० वर्ष टिकणार आहे. ह्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार बदलले आहे. आताचे सरकार बदलेल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
अधिक वाचा : फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा
पुढे ते म्हणाले की, कोणामध्ये नाराजी असण्याचे काही कारण नाही. सर्वांना मंत्री पद मिळणार नाहीत. मनात नाराजी असते. प्रत्येकाला वाटते सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे, पण ती मिळत नाही. मंत्रीमंडळ हे ४०-४५ मंत्रीपदांचे असणार आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळेल असे नाही. विस्तार झाला की लोक नाराज होतील आणि सरकार पडेल, अशी वलग्ना विरोधकांकडून केली जाईल.