बेळगाव / प्रतिनिधी
आपल्या हृदयाची चिंता प्रत्येकाला असणे स्वाभाविक आहे. हा मानवी शरिरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्याचे काम रक्त शुद्ध करणे आणि ते सर्व शरीरात पोहचविणे हे आहे. हृदय हे चार झडपांचे (व्हॉल्व्हज) बनलेले असते. यापैकी ऑर्टिक झडप ही जंतुसंसर्ग किंवा वृद्धत्व यामुळे कमजोर होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आतापर्यंत या समस्येवर शस्त्रक्रिया हा एकच मार्ग होता. शस्त्रक्रिया करून नवी कृत्रिम ऑर्टिक झडप बसविणे हा उपाय आहे.
तथापि, कृत्रिम झपडेच्याही अनेक समस्या असतात. ती लवकर खराब होते. तिचे आयुष्य 10 ते 15 वर्षांचेच असते. ही झडप बसविल्यानंतर अशा व्यक्तीला पुढे आयुष्यभर रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात. तसेच या झडपेच्या सुरक्षितेसाठी सातत्याने ऊग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी लागते. तसेच एक कृत्रिम झडप खराब झाल्यास पुन्हा शस्त्रक्रिया करून नवी झडप बसवावी लागते. अशा प्रकारे ऊग्णाला सातत्याने हा त्रास सहन करावा लागतो.
ओझाकीचे नवे तंत्र
या समस्यांवर मात करण्यासाठी जपानच्या संशोधकांनी ‘ओझाकी’ ही नवी प्रक्रिया शोधून काढली आहे. जपानचे डॉ. उकियो ओझाकी यांनी ही प्रक्रिया शोधल्याने तिला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत हृदयाच्या झडपेनजीच्या ऊतींचा उपयोग करून खराब ऑर्टिक झडपेची पुनर्रचना केली जाते. ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याने तिच्याद्वारे होणारी पुनर्रचना अधिक काळ टिकणारी व कमी त्रासाची असते हे आता सिद्ध झालेले आहे.
केएलईएसमध्ये सुविधा भारतात केवळ आठ केंद्रांमध्ये ओझाकी सुविधा उपलब्ध आहे. या केंद्रांमध्ये बेळगावच्या केएलईएस ऊग्णालयाचा समावेश आहे. ऑर्टिक झडपेचा विकास असणाऱ्या ऊग्णांवर येथे ओझाकी पद्धतीने उपचार केले जातात. जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर शिवकुमार शिवलिंगम हे या पद्धतीचे तज्ञ आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये 5 ऊग्णांवर या पद्धतीद्वारे यशस्वी उपचार केलेले आहेत. या ऊग्णांची प्रकृती सुधारत आहे. डॉ. रिचर्ड सालढाणा (मुख्य हृदय सर्जन), डॉ. मोहन गण (कार्डिअन सर्जरी युनिट प्रमुख) डॉ. शरणगौडा पाटील, डॉ आनंद वगराळी हे तज्ञ या प्रक्रियेचा भाग आहेत. केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पुढाकाराने ही सुविधा बेळगाव आणि परिसरातील ऊग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून तिचा लाभ उठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









