वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
अलतगा फाट्याजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर अनंत चतुर्थी दिवशी कंग्राळी खुर्द-अलतगा पंचक्रोशी भागातील भाविकांना घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली असून भाविकांनी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन कंग्राळी खुर्द ग्रा. पं. व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी के.पी.सी.सी. सदस्य मलगोंडा पाटील व काकती पोलीस स्टेनचे पोलीस उपनिरिक्षक मंजुनाथ नाईक, पी.डी.ओ. गोपाळ नाईकसह ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, गणपत सुतार, देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत धुडूम व ग्रामस्थांनी पाहणी करून गणेश विसर्जनवेळी भक्तांनी खबरदारी घ्यावयाची सूचना केली. या ठिकाणी अलतगा, कंग्राळी खुर्द, जाफरवाडी, अगसगेसह अन्य गावचे हजारो लोक गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदीकाठोकाठ भरुन वहात आहे. त्यामुळे विसर्जनवेळी कोणताही धोका होऊ नये यासाठी अलतगा ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मलगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
भाविकांनी खबरदारी घ्यावी
बंधाऱ्यापर्यंत भाविकांना गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी रस्ता,निर्माल्य नदीत न टाकता बाजूला टाकण्याची सोय तसेच रात्रीच्या वेळी विसर्जनावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कंग्राळी खुर्द ग्रा. पं. च्यावतीने हॅलोजन लाईटची व्यवस्था, सुरक्षितता म्हणून लाईफ जॅकेट उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांनी खबरदारी घेऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अलतगा माळावरील खाणीतील पाण्यात विसर्जन न करण्याची मागणी
अलतगा गावच्या माळावरील खाणीतील तुंबलेल्या पाण्यामध्ये काही भाविक गणेशमूर्ती विसर्जन करतात. हे पाणी वाहते नसून ते जनावरांना पिण्यासाठी वापरले जाते. तरी त्या ठिकाणी कोणीही भाविकांनी विसर्जन करू नये, असे आवाहन अलतगे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे अलतगा ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.









