नीतू कपूरची कन्या रिद्धिमाची एंट्री
फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स सीझन 3 पुन्हा भेटीला येत आहे. याचा ऑफिशियल ट्रेलर सादर करण्यात आला आहे. यात आणखी काही नवे चेहरे जोडले असून त्यांना पाहून प्रेक्षक अत्यंत उत्सुक झाले आहेत. आता यातनेटफ्लिक्सवर हा शो पाहता येणार आहे. शोचा नवा सीझन 18 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. यात नीलम कोठारी-सोनी, महिप कपूरसोबत भावना पांडे आणि सीमा सजदेह देखील असणार आहे.
या सीझनमध्ये काही नवे चेहरे जोडले जाणार आहेत. ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांची कन्या रिद्धिमा कपूर साहनी, पीएएससीओ ग्रूपचे अध्यक्ष संजय पासी यांच्या पत्नी आणि आर्ट डिझायनर कलेक्टर शालिनी पासी, उद्योजिका कल्याणी साहा हे दिग्गज या सीझनमध्ये दिसून येणार आहेत.









