पायलटने पॅराशूटच्या आधारे वाचविला जीव
वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गुरुवारी नौदलाचे एक एफ-35 लढाऊ विमान कोसळले. तथापि, विमानाचा पायलट अपघातापूर्वी यशस्वीरित्या बाहेर पडला. अमेरिकन नौदलाने याची पुष्टी केली आहे. सध्या अपघाताचे कारण कळलेले नाही. अपघातग्रस्त झालेले विमान एक स्टील्थ फायटर जेट होते. ते स्ट्राइक फायटर स्क्वॉड्रन व्हीएफ-125 चा भाग होते. या स्क्वॉड्रनचा वापर वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. एफ-35 स्टेल्थ फायटर जेट हे जगातील सर्वात महागडे विमान मानले जाते. अमेरिकेने ते बनवण्यासाठी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते. हे विमान कोणत्याही रडार प्रणालीला चुकवू शकते असे म्हटले जाते. त्यात अत्याधुनिक रडारसह इतर अनेक उच्च-तंत्रज्ञानाचा समावेश असल्यामुळे ते अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी बनते. या अत्याधुनिक लढाऊ विमानात सुमारे 2200 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ते अण्वस्त्रs तसेच अनेक प्रकारची क्षेपणास्त्रs आणि बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यात हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि मार्गदर्शित बॉम्बसारखी आधुनिक शस्त्रs समाविष्ट आहेत. ते हेरगिरी आणि देखरेख यासारख्या मोहिमा देखील पार पाडू शकते. अमेरिकन नौदल 2019 पासून हे विमान वापरत आहे.









