वादळ आलं, वारा सुटला. गुजरात, राजस्थानात वादळाने हाहाकार माजवला. कोकणात गणपतीपुळे येथे भव्य लाटांचे पाणी बाजारपेठेत घुसले अशा एकीकडे वार्ता येत आहेत. तर दुसरीकडे अनेक भागात उष्णतेमुळे जिवाची काहिली सुऊ आहे. राजकीय पक्ष व नेते सोयीच्या राजकारणात दंग आहेत. अनेक भागात, गावात एकही उन्हाळी वा वळवाचा पाऊस पडलेला नाही. धरणे, तलाव कोरडे पडू लागले आहेत. पाणीबाणीची स्थिती थरकाप उडवते आहे. जूनची 22 तारीख आली असून पावसाचा थेंब नाही. शेतकऱ्यांचेच नव्हे सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पंढरीची वारी विठ्ठलनामाचा घोष करत पंढरीकडे कुच करत असली तरी उजनी कोरडे पडले आहे. कृष्णा, पंचगंगा, भीमा यांची वेगळी अवस्था नाही. वारणा धरणात थोडे पाणी असल्याने सांगलीची तहान भागत असली तरी यंदाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. संकटातला शेतकरी निसर्गाच्या या अवताराने पुरता भयभीत झाला आहे. आभाळाकडे पहात त्यांचे डोळे पाझऊ लागले आहेत. काय होणार यांची चिंता त्याला धास्तावते आहे. साधारण मे महिन्यात मशागत कऊन शेतकरी खरीप हंगामाची तयारी करतो. एक-दोन उन्हाळी पाऊस झाले की नांगरट केलेली राने मशागत करायला हाताशी येतात. साधारण सात जूनला पाऊस सुऊ होतो. मान्सूनचे आगमन होते आणि शिवारात चिंब पावसात भिजत बळीराजा तिफण चालवत पेरा करतो. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात ऊस, ज्वारी, सोयाबिन, मका, भात, भुईमूग, कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अडसाली ऊस लावला जातो. काही भागात धुळवाफ पेरण्या मे मध्येच केल्या जातात आणि सोयाबीन पेरणी मे अखेर केली जाते. पण यंदा हे सारे संकटात सापडले आहे. पावसाचा थेंब पडला नाही अशी अनेक गावे आहेत. अनेक ठिकाणचे पाझर तलाव, शेततळी कोरडी पडली आहेत. धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने पिण्याचा पाणी पुरवठा व वीजनिर्मितीवर गंभीर परिणाम झाला आहे. तारखेवर तारीख असे हवामान खात्याचे अंदाज येत आहेत. काही स्वयंघोषित तज्ञ सोशल मीडियावऊन कधी, केव्हा, कुठे पाऊस पडणार यांच्या तारखा सांगत आहेत. पण पावसाचे आगमन झालेले नाही. मान्सून मुंबईत आला. केरळात आला असे म्हटले जात असले तरी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणासह विदर्भ, मराठवाडा होरपळून निघतो आहे. सर्वत्र पंखे सुऊ आहेत. थंड पेयाची बाजारपेठ फुल्ल आहे आणि अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यावर मर्यादा आल्याने उपसा बंदी घातल्याने उद्योग धंद्यासह जनजीवन संकटात आले आहे. देशात आणि राज्यात महागाई व बेरोजगारीने कळस गाठला आहे. स्थानिक उद्योग-व्यवसाय अडचणीत आहे. भाज्या, फळे महाग झाली आहेत. पण त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. कोथिंबीरची जुडी 40 ऊपये, मेथीची पेंडी 30 ऊपये, लसूण 200 ऊपये किलो, आले 300 ऊपये किलो, लिंबू 5 ऊपये असे चढे दर असल्याने ग्राहक वैतागत असला तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चच जादाचा असल्याने व बियाणांपासून शेतमजुरीपर्यंत आणि खते, औषधे यांचे दर प्रचंड झाल्याने शेतकरीही वैतागले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. उपसाबंदी आहे. पाऊस नाही, विद्युत निर्मितीवरही मर्यादा आल्या आहेत आणि या साऱ्या संकटावर मात करायची तर पाऊस बरसणे महत्वाचे आहे. गेली काही वर्षे निसर्गाचा ऱ्हास झाल्याने त्यांचे उन, पाऊस, उष्णता, थंडी यावर गंभीर परिणाम जाणवत आहेत. निसर्ग रक्षण व संवर्धनासाठीच्या शासकीय योजना, तिजोरीवर डल्ला मारण्यासाठीच राबवल्या जात आहेत. रस्त्याचे जाळे, इंधनाचा धूर आणि वृक्षतोड, पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषण यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतुत बदल होताना दिसत आहे. जागतिक तापमानात मोठी वाढ होते आहे. राज्यातही उष्णतेचा पारा 47 अंशापर्यत पोहोचताना आढळला आहे. नद्याचे प्रदुषण, धरणातील गाळ, जंगलाचे व जंगली प्राण्याचे रक्षण असे अनेक विषय आहेत. कुठे ढगफुटी तर कुठे जमिनीचे वाळवंटीकरण, कुठे मरणाचे तापमान तर कुठे बर्फवृष्टी यामुळे सर्वत्र सतत अनिश्चितता व भयप्रद वातावरण असते. यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी पर्यावरण शास्त्राr विविध उपाय ओरडून सांगत आहेत. कार्बनचे उत्सर्जन कमी झाले पाहिजे. वृक्षाचे जतन व जंगलाचे संवर्धन केले पाहिजे. संकटातून शहाणे झाले पाहिजे. पण पैसा, चंगळ आणि स्वार्थ यामागे लागलेला समाज गंभीर होताना व चांगली कृती करताना दिसत नाही. शाळा, महाविद्यालयाची ग्राऊंडस, उघडी, बोडकी असतात. दरवर्षी त्याच ख•dयात वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. फोटो काढले जातात. सोशल मीडियात पाठ थोपटून घेतली जाते. पण वसुंधरेचे रक्षण, संवर्धन होताना दिसत नाही. यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल असा पहिला अंदाज सर्वांच्या मनाला सुख देणारा ठरला. पण पुढे एल नॅनो, चक्रीवादळ आणि मान्सूनला पोषक स्थिती नाही अशा बातम्या येऊ लागल्या. मान्सून तीन दिवस उशिराने येणार असे म्हणत-म्हणत जूनची 22 तारीख उजाडली. वारीतील वारकरी अजून एकदाही भिजले नाहीत की पावसाचा कुठे समाधानकारक शिडकावा झाला नाही. ओघानेच सारे संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, दुष्काळ, उद्योगधंदे अडचणीत, मंदी, महागाई असे भयाण चित्र समोर दिसत आहे. पुढे काय वाढून ठेवले आहे माहित नाही पण या सप्ताहात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाची हजेरी लागेल. मान्सूनचे ढग येण्यासाठी पोषक स्थिती आहे वगैरे सांगितले जाते आहे. लवकरात-लवकर पाऊस पडो आणि नदी-नाले, तलाव, धरणे यांना मुबलक पाण्याची अनुभूती येवो अशी अपेक्षा आहे. त्याचसाठी आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला शेतकरी मेघा पाणी दे, पाणी दे अशी विनवणी करतो आहे. कृषी खात्यानेही पावसाच्या या संकटाची नोंद घेऊन व उशिरा येणाऱ्या पावसाची शक्यता गृहीत धऊन खरिपाची तयारी केली पाहिजे. या संकटातही संधी शोधत धरणातील व तलाव, नदीतील गाळ काढता येईल का याचाही युद्धपातळीवर विचार कऊन निर्णय व अंमलबजावणी गरजेची आहे. गाळाने भरलेली धरणे गाळमुक्त केली तर पाणीसाठाही वाढेल आणि या मातीतून क्षारपड जमीन सुधारणा वगैरे प्रयोग यशस्वी होतील. तूर्त आभाळाकडे डोळे लागले आहेत आणि पावसाची प्रतीक्षा आहे.








