आरटीओ कार्यालयामार्फत सुरु आहे नेत्र तपासणी
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत “मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिर” उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात साईप्रसाद हॉटेल,झाराप येथे पार पडले. या तपासणी शिबिरात ४८ खाजगी बस चालक यांची तपासणी करण्यात आली.









