प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फाउंडेशनने बेळगावातील नेत्रदर्शन नेत्र रूग्णालयाच्या सहकार्याने माण गावात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम राबविला. लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी माण हे एक गाव आहे. लोककल्प फौंडेशनचे मुख्य उद्दिष्ट या गावांतील शिक्षणात सुधारणा करणे, हे आहे. उपजीविका देण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आरोग्य क्षेत्रातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, लोककल्प फौंडेशन या 32 गावांमध्ये सातत्याने आरोग्य शिबिरे, दंत शिबिरे, नेत्रशिबिरे आयोजित करत आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशन विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य शिबिरे राबवित आहे. लोककल्प फौंडेशनचे अध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फौंडेशन स्वयंसेवकांमार्फत दत्तक खेड्यात हे कार्यक्रम आयोजित करीत आहे.
या उपक्रमासाठी नेत्रदर्शन रूग्णालय बेळगाव लोककल्प फौंडेशनला सहकार्य करत आहे आणि गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी मदत करत आहे. नेत्रशिबिरात गावातील 100 पुऊष, महिला व लहान मुले सहभागी झाली होती. त्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांशी संबंधित इतर आजार समजावून सांगण्यात आले.
नेत्रदर्शनमधील डॉ. अल्पेश टोपराणी, डॉ. सचिन माहुली या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संगीता आर. के., ऐराफ, अभी के., विशाल हेगडे, मुस्कान यांनी ऊग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी लोककल्पचे स्वयंसेवक उपस्थित होते.









