बेळगाव :
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडची उद्यमबाग शाखा लोककल्प फाऊंडेशन व डॉ. कोडकणी सुपरस्पेशालिटी आय सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमबाग येथील सामान्य जनतेसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. शंभरहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. कोडकणी सुपरस्पेशालिटी आय सेंटरच्या शिल्पा वाली, ऑप्टोमेट्रिस्ट सौम्या पाटील व डॉ. शशांक यांनी नेत्रतपासणी केली. लोकमान्य सोसायटीचे प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी यांनी कोडकणी आय सेंटरच्या प्रतिनिधींचा सत्कार केला. याप्रसंगी सोसायटीच्या उद्यमबाग शाखेचे व्यवस्थापक, कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.









