9 पासून मुंबई, पुणे, बेंगळूर विशेष बससेवा
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दि. 10 नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. दिवाळीत सुटीसाठी मूळगावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी मुंबई, बेंगळूर, पुणे आणि गोवा मार्गांवर जादा बस सोडल्या जाणार आहेत.
दिवाळीच्या काळातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन 10 नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून जादा बस सोडल्या जाणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून बेंगळूर आणि इतर ठिकाणी बससेवा पुरविली जाणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी दि. 9 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. परिवहनकडून यात्रा, जत्रा, सण, उत्सवांच्या काळात अतिरिक्त बससेवा पुरविली जाते. त्यामुळे जादा महसूलही प्राप्त होतो. यंदा शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन तिकीटची व्यवस्था करण्यात आली आहे. wwwक्srtम्.ग्ह या वेबसाईटवर आगावू तिकीट बुकिंग सुरू आहे. शिवाय परिवहनने घरबसल्या तिकीट बुकिंग व्हावे, यासाठी अॅपची व्यवस्था केली आहे.
राज्यांतर्गत बससेवेसाठी महिलांना मोफत प्रवास
दिवाळीसाठी जादा बसची तजवीज करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासून विविध ठिकाणी जादा बस धावणार आहेत. राज्यांतर्गत बससेवेसाठी महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बससेवा पुरविली जाणार आहे.









