आंबेडकर जयंती, गुड फ्रायडेच्या सुटीमुळे ये-जा करणाऱयांची संख्या अधिक
प्रतिनिधी / बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि विकेंडला विविध मार्गांवर जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे तर रविवारी कार्यालयीन सुटी असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. याकरिता मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गावर विशेष बसची व्यवस्था केली जाणार आहे.
या आठवडय़ात तीन दिवस सुटी असल्याने ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढणार आहे. विशेषतः गुरुवारपासून लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची वर्दळ अधिक असणार आहे. आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे त्या पाठोपाठ रविवारी कार्यालयीन सुटी असल्याने ये-जा करणाऱयांची संख्या वाढणार आहे. याकरिता विविध मार्गांवर जादा बस सोडल्या जाणार आहेत.









